बबडू, त्याची ऑक्सीजन पातळी, त्याची देशभक्ती आणि ऑक्सीजनसाठी लोकांची धावाधाव...
कालपरत्वे बबडू परत मोठा झाला. त्याच्याकडे नगराचे काम आले. हे कधी होईल असे त्याला वाटले नव्हते. बैठकांच्या जोरावर आपण मोठी मजल मारली, असे त्याला वाटले. महत्त्वाचे म्हणजे करोनामुळे वरिष्ठ जागा रिकाम्याच झाल्या होत्या. पहिल्या लाटेत तो बावचळला होता, पण आता दुसऱ्या लाटेत सुरुवातीला त्याचा धीर चेपला. मृत्यूचा दर जास्त होता, तरीही घरच्यांनी हरकत घेतली नाही. आमचे कुटुंब ‘देशभक्त’ आहे, असे त्याने बोलूनही दाखवले.......